Exam Form Online

Please read below instructions before Applying for Exam forms

From Academic year, 2016-2017 Savitribai Phule Pune University has introduced new system for Students as Student Profile System. Every student who wish to apply for Exam form online need to be registered on this system

Features of Student Profile System (SPS)

 • This is one-time /permanent profile/account system for student
 • Once Registered student will be able to use same account (username-password) across multiple online applications of university through out his course. i.e. Student will be able to use this account from first year of course to degree
 • Valid Email Account and Valid Mobile number of student is must while registering for this profile. Email will be the username of system
 • No duplicate registration is allowed on same email id/mobile number
 • Only one account per PRN/Eligibility number is allowed

Important Instructions for  Student Profile System (SPS)

 • Before registering to account on this system you need to have following things with you
  • PUNCODE:  Unique 10 digit Code Assigned to each college by university, which starts with C or I or R. Also known as BCUD username.
  • Eligibility No: Every student gets this number when his eligibility is done by college in eligibility online portal. This number is must for creating account
   Please contact your college to get this number.
   This number is not applicable to
   • For International Students this number is not applicable
   • For students who completed his/her first year in external and now migrated to regular mode of course from second year
   • Students whose admission year for course is before 2010-2011
  • PRN: Permanent Registration Number – This number is allotted to a student when he/she first appears for university exam.  This number is must for creating account. This number is printed on student's university mark sheet.

   Based upon data in your profile your exam form will be made available to you, so please provide accurate information in profile.
 • Steps To Create Profile
  • Create Account
   • Use valid email id and Mobile number for account creation
  • Enroll for the Course
   • In Student Type option please select proper option
    • New  : Only for those students who have taken admission for first year (or direct Second year in case of Engineering) of course in the college and do not have previous record of eligibility number or PRN for the course
    • Existing:
     • This is Applicable for
     • For second year fresh students of arts, commerce, science UG courses whose FY exam is conducted by College. Eligibility number is must for these students
     • For those students who have either PRN OR eligibility number or both numbers.
     • After you enter eligibility, number in specified text box system will verify with eligibility data and according message is displayed to you.  Please be remember if you do not give eligibility number then in that case such result declaration might be affected. 
     • After you enter PRN, number is specified text box system will verify with PRN data and according message is displayed to you. If you get message PRN not FOUND please contact college
      In addition, if a student does not give PRN number then he will be considered as Fresh student and only first year/first semester subjects will be displayed in exam form. 
    • Dual /CIS : This option is for those students who wish to apply for dual degree exam form/ Class improvement exam form
  • Fill Basic profile 
   • Based on Enroll for the course information basic profile like name, mother name, gender, category, address will be displayed to you.
   • If you provide PRN number, data of name and mother name will be fetched from PRN history Data.
   • If you provide  only eligibility number,  data of name and mother name will be fetched from eligibility Data.
   • Students who selected NEW in student type need to fill all information by himself.
After you complete profile, click on exam form link provided in left side menu. you'll be directed to exam form online system  

शैक्षणिक वर्ष 2016-2017  पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने  Student Profile System म्हणून विद्यार्थ्यांसाठी नवीन प्रणाली सुरू केली आहे. ऑनलाइन परीक्षा फॉर्म अर्ज इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या विद्यार्थी प्रोफाइल या सिस्टम वर नोंदणी करणे आवश्यक आहे.

Student Profile System वैशिष्ट्ये (एसपीएस )

 • या सिस्टम मध्ये एकदाच नोंदणी करणे आवश्यक आहे .
 • एकदा नोंदणी केल्यास विद्यार्थी हेच अकाउंट (username-password ) विद्यापीठाच्या वेगवेगळ्या ऑनलाइन सिस्टम मध्ये वापरू शकतो. म्हणजेच एकदा नोंदणी केल्यास हे अकाउंट तो विद्यार्थी प्रथम वर्षापासून पदवी मिळेपर्यंत वापरू शकतो.
 • हे प्रोफाइल नोंदणी करताना वैध ईमेल खाते आणि वैध मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. ईमेल हाच username असेल.
 • एका ईमेल आयडी/मोबाइल नंबरवर एकाच अकाउंट होऊ शकते
 • एका PRN/Eligbility नंबरवर एकाच अकाउंट होऊ शकते       

Student Profile System (SPS) साठी महत्वाच्या सूचना

 • या प्रणालीवर खाते नोंदणी करण्यापूर्वी आपणाकडे खालील गोष्टी असणे आवश्यक आहे
  • PUNCODE:  हा दहा अंकी क्रमांक प्रत्येक महाविद्यालयास दिलेले आहे, ज्याची सुरुवात C किंवा I किंवा R ने होते. या क्रमांकास bcud username असेही संबोधले जाते. 
  • Eligibility No: प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासक्रमास महाविद्यालयात प्रथम प्रवेश घेतल्यानंतर महाविद्यालयाकडून ऑनलाइन eligibility करून घेतली जाते, तेव्हा हा नंबर दिला जातो. हा नंबर खाते तयार करण्यासाठी आवश्यक आहे . हा नंबर प्राप्त करण्यासाठी आपल्या कॉलेजशी संपर्क साधा

   खालील प्रकारच्या विद्यार्थ्यांना हा  नंबर लागू होत नाही
   • आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी हा नंबर लागू नाही
   • ज्या विद्यार्थ्यानी बही: स्थ(external) म्हणून प्रथम वर्षास प्रवेश घेतला होता व त्यानंतर द्वितीय वर्षापासून त्यांनी नियमित विद्यार्थी म्हणून महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे
   • ज्या विद्यार्थ्यानी 2010-2011 पूर्वी महाविद्यालयात चालू अभ्यासक्रमास प्रवेश घेतला असेल त्यांना लागू  नाही
  • PRN: Permanent Registration Number – ज्या वेळेस विद्यार्थी चालू अभ्यासक्रमासाठी प्रथमतः विद्यापीठाच्या परीक्षेस बसतो तेव्हा त्यास हा नंबर दिला जातो. हा नंबर खाते तयार करण्यासाठी आवश्यक आहे. हा नंबर विद्यार्थ्याच्या गुण पत्रकावर छापलेला असतो.


आपल्या प्रोफाईलमध्ये असलेल्या महितीवरूनच तुमचा परीक्षा फॉर्म तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल, त्यामुळे प्रोफाइल मध्ये अचूक माहिती भरा

 • Profile तयार करण्याचे टप्पे
  • Create Account
   • प्रोफाईल अकाउंट तयार करण्याकरिता वैध ई-मेल आणि मोबाईल नंबरचा वापर करा
  • Enroll for the Course
   • Student Type निवडताना योग्य पर्याय निवडा
    • New : हा पर्याय त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी या चालू वर्षात प्रथम वर्षासाठी (किंवा अभियांत्रिकी शाखेत सरळ द्वितीय वर्षाला ) अभ्यासक्रमास महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे व त्या विद्यार्थ्यांना यापूर्वी या अभ्यासक्रमासाठी PRN किंवा eligibility नंबर भेटलेला नाही
    • Existing:
     • हा पर्याय खालील प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
     • कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेतील पदवी स्तरावरील ज्या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर घेतल्या जातात व ज्या विद्यार्थ्यांना आता द्वितीय वर्षासाठी परीक्षा अर्ज भरावयाचा आहे. या विद्यार्थ्यांना eligibility नंबर भरणे आवश्यक आहे
     • ज्या विद्यार्थ्यांकडे eligibility नंबर किंवा PRN नंबर किंवा दोन्ही असेल त्यांच्यासाठी हा पर्याय लागू आहे
     • Eligibility नंबर फॉर्ममध्ये दिलेल्या ठिकाणी टाकल्यानंतर तो नंबर सिस्टम मध्ये तपासला जातो व त्याचा मेसेज तुम्हाला तिथे दाखविला जातो. जर आपण eligibility नंबर लागू असतानाही दिला नाहीत तर आपणास निकालाच्या वेळेस अडचण येऊ शकते.
     • PRN नंबर फॉर्ममध्ये दिलेल्या ठिकाणी टाकल्यानंतर तो नंबर सिस्टम मध्ये तपासला जातो व त्याचा मेसेज तुम्हाला तिथे दाखविला जातो. जर आपणास PRN NOT Found असा मेसेज दिसला तर आपण आपल्या महाविद्यालयास संपर्क साधावा.
      जर आपण PRN नंबर लागू असतानाही दिला नाहीत तर आपणास Fresh student समजून फक्त प्रथम वर्ष/प्रथम सेमिस्टरचेच विषय exam form मध्ये दिसतील.
    • DUAL/CIS: हा पर्याय ज्या विद्यार्थ्यांना DUAL degree किंवा Class improvement चा फॉर्म भरावयाचा आहे त्यांच्यासाठी आहे.
  • Fill Basic profile
   • तुम्ही वरील टप्प्यात (Enroll for Course) मध्ये दिलेल्या माहिती वरून तुमचे नाव,आईचे नाव,  gender, category, address इत्यादि माहिती दर्शविली जाईल.
   • जर तुम्ही PRN नंबर दिला असेल तर तुमचे नाव व आईचे नाव PRN history data मधून दाखविले जाईल.
   • जर तुम्ही फक्त eligibility नंबर दिल्यास तर तुमचे नाव व आईचे नाव Eligibility data मधून दाखविले जाईल.
   • ज्यांनी Student type 'NEW' निवडला असेल त्यांना संपूर्ण माहिती स्वतः भरावी लागेल
तुमचे प्रोफाइल complete झाल्यावर डाव्या बाजूच्या मेनू मधून Exam Form Online link वर क्लिक करा. तुम्हाला exam form ऑनलाइन ची वेबसाइट दिसेल तिथे परीक्षा अर्ज भरा.

If you have Not created Profile then go to Student Profile System first
Student Profile System
If you have created Profile then go to exam form & apply
Exam Form Login